भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.

0

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता. 

माणसांच्या गर्दीत 
हरवून बसला माझा भाऊ 
सांगा ना त्याला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

एकुलता एक दादा 
त्याला जिवापाड जपला 
लग्न झाल्या पासून 
वाहिनी च्या पदरा आड लपला 
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ 
सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

नको दादा साडी मला 
नको पैसा पाणी 
तुझ्या सूखा साठीच 
देवा ला करते विनवणी 
सांग तुला कोणत्या रंगाचा  शर्ट घेऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. .... 

काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते 
तळ हातावरले फोड बघून 
तूझी आठवण येते 
दादा चढउतार होतात जीवनात 
तू घाबरुन नको जाऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

उचलत नाहीस फोन म्हणून 
वहीनीला केला 
Wrong नम्बर करत 
कट त्यांनी केला 
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ 
दादा सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

आई बाबा सोडून गेले 
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ 
डोळ्यामधी आले 
वाईट वाटते शेजारी येतात  जेव्हा त्यांचे भाऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....

नको मला जमीन 
नको घराची वाटणी 
आवडीने खाईन 
भाकरी आणि चटणी 
काकूळती ला आला जीव 
मनात राग नको ठेऊ 
दादा सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ ..... 
😢😢😢😢 😔😔😔😔
आवडली तर नक्की शेयर करा🙏


🌺"साद आईची"🌺

0

🌺"साद आईची"🌺

महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते

भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते

पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला

शेवटपर्यंत सांगत होता,
 लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला

माझ्याही ह्रदयात फोटो,
 तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.

दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला

वर्षाकाठी एक कपडा,
 पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.

धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी

तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.

थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले

विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?

आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

एकदा तरी सिविल इंजीनियर वर प्रेम करुन पहा

0

सिविल इंजीनियर म्हणजे काय ………

सिविल इंजीनियर म्हणजे फीरता वारा

 सिविल इंजीनियर म्हणजे वाहता झरा।
सिविल इंजीनियर  म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।

 सिविल इंजीनियर   अंगावरील शहारा
       सिविल इंजीनियर रात्रीचा पहारा।
       फक्त  सिविल इंजीनियर आहे
       सुख अन दु:खाचा सहारा।।

सिविल इंजीनियर जन हिताचा नारा
सिविल इंजीनियर आहे अनमोल हिरा।
सिविल इंजीनियर   म्हणजे धाक दराराv
       त्याचाच आहे वचक सारा।
       काहीही करु शकतो सिविल    इंजीनियर
       जर असेल तो नितीनं खरा।।

सिविल इंजीनियर  प्रेम करुन पहा

एकदा तरी  सिविल इंजीनियर वर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।

         जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा।
         त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा।।

कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा।
          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा।।

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।

         एकदा तरी सिविल इंजीनियर वर
          प्रेम करुन पहा।
          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा।।

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
सिविल इंजीनियरच्या यातना सोसुन पहा।।

     एकदा तरी  सिविल इंजीनियर वर
          तुम्ही प्रेम करुन पहा……

Prem kavita

0

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही.

तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळि करपेल, थांबा जरा राहू दे"

तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?
"ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर?"

"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"

"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"

"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघा तुमच्या नादामधे भाजी झाली तिखट"

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।

"थोडासा…" त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"

"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"

"बोललास हेच पुरे झाल…
एकच फ़क्त विसरलास…

माप ओलांडून आले होते, तेव्हाच माझ जग
तुझ्या जगात नाही का विरघळलं?"

"अप्रतिम लेख by नाना पाटेकर"

0

वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. 'त्यांनी काही खाल्लं असेल का?' असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.

अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, "मी भिकारी नाही." तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.

3सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी "कसं आहे?" अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.

खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेल. ...........नाना

Ek AAI

0

नीट वाचा …मनाला लागेल…
पावसाळ्याचे दिवस सुरु होते..
पावसाने राज्यात थैमान घातले
होते.. जणू
ढगांना झालेल्या कसल्यातरी दु:खामुळे
ढग जोर-जोरात रडत
होते...
पावसाच्या सरीवर सरी कोसळत
होत्या.. घरातून बाहेर
निघायची सोय
नव्हती...आणि अशा परिस्थितीत अजय
आणि मेघा त्यांच्या चारचाकी कार
ने घरी निघाले होते.....
पावसामुळे समोरचे काही दिसत नव्हते,
म्हणून अजय कार हळू
चालवत
होता.दोघांना घरी पोहचायला उशीर
होणार होता.... आणि पाऊस
त्यांच्या वाटेत अजून बाधा घालत
होता. दोघेही वैतागलेलेहोते. पण
निसर्गापुढे आजपर्यंत
कोणाचे काही चालले आहे का??? हळू हळू
रात्र
झाली होती.ढगालेल्या वातावरणामुळे
काळोख
अगदी गडद झाला होता. आता सरळ
रस्ता संपून घात उतार
सुरु झाला होता. आणि अजय देखील
कार सावधानतेने चालवत
होता. मधेच काळ्याअंधाराला चिरत
एखादी वीज जणू
पावसाच्या प्रचंडतेची जाणीव अजय
आणि मेघाला करू देत
होती.....पावसाळ्याचेदिवस चालू
असल्याने गाड्यांचा वावर देखील
कमी झाला होता. घाट
उतारावरील
एका वळणावर अजय ने
गाडीला जोरदार ब्रेक लावला.....
जोरदार आवाज झाला....कार
थोडी घसरली... त्या धक्क्याने
कारच्या हेड लाईट बंद पडल्या... कार
देखील घाटाच्या मध्यावर
बंदं पडली....मेघाला क्षणभर सुचलेच
नाही काय झाले
ते.ती कावरी-बावरी होऊन अजय वर
ओरडली.... पण अजय ला काळोखात जे
दिसलं ते
मेघाच्या डोळ्यांनी पाहिलं नव्हतं....
आणि चमकणाऱ्या विजांच्या पांढऱ्या प्रकाशात
त्याला एक
बाई
त्याच्या कार च्या पुढे
उभी असलेली दिसली.अंगावरील
कपडे फाटली होती, डोक्यातून रक्त येत
होते, हात-पाय रक्ताने माखले होते,
जणू त्या बाईचा आताच अपघात
झाला होता.....ती बाई कार पासून
थोड्या अंतरावर उभी होती.
आता तर मेघाचे देखील तिच्याकडे लक्ष
गेलं आणि भीतीपोटी मेघाच्या तोंडून
मोठी किंकाळी निघाली....
ती प्रचंड
घाबरली होती. अजय तिला समजावत
होता, पण तिचे घाबरणे कमी होत
नव्हते,तिला धाप
लागली होती.....ती बाई
धावतच अजय च्या कार जवळ
आली,मेघाने झट-पट
खिडक्यांच्या काचा वर घेतल्या.
इतक्यात त्या बाईचे रक्ताने माखलेले
हात कारच्या काचेवर
रेंगाळू लागले.....अजय
देखील मनातून घाबरला होता, त्याने
कार चालू करण्याचा खूप प्रयत्न केला पण
कार चालू झाली नाही. त्या बाईचे
रक्ताने
माखलेले हात
काचेवरती फिरताना पाहून
मेघा घाबरलेली होती. ..
तिला सावरणे अजयसाठी कठीण झाले
होते.... इतक्यात अजय
चे लक्ष त्या बाईच्या हातांकडे
गेले...त्या बाईचे दोन्ही हात
अजय आणि मेघा समोर जोडले गेले होते जणू
ती बाई मदत मागत होती.... अजय ने
माणशी काहीतरी विचार
केला आणि कार मधून घाबरतच
बाहेर
पडला... मेघा देखील
त्याच्या पाठोपाठ कार मध्ये
उतरली... इतक्यात त्या बाईने अजय पाय
पकडले आणि रडू
लागली.... रडत रडत बोलू लागली....,"
माझा अपघात झाला आहे
आणि माझी गाडी दरीत अडकली आहे
माझा ४
वर्षांचा मुलगा त्या गाडीत
अडकला आहे...
please
तुम्ही त्याला वाचवा ना...."आणि पुन्हा रडू
लागली....
मेघा ला मात्र हा भलताच प्रकार
वाटू लागल्याने मेघा खूप
घाबरली , आणि अजय ला तिथून निघून
जाऊ असे म्हणू
लागली..... पण अजय ने त्या बाईला मदत
करण्याचं पक्क केलं होतं...तो त्या बाई
ला म्हणाला,
'चला ताई,दाखवा मला कुठे आहे
तुमची कार,मी करतो तुम्हाला मदत',
आणि ती बाई पुढे चालू
लागली तसे तिच्या पाठी अजय
आणि मेघा देखील चालू लागले.... ते
दोघेही दरीच्या एका उंच
कड्यावर
पोहचले होते... अजय ला तिथून
रडणाऱ्या बाळाचा आवाज स्पष्ट येत
होता...वरून पावसाची तिरीप डोळे
उघडायची संधी देत
नव्हती... अशा मुसळधार पावसात अजय
त्या छोट्या जीवाचे
प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण
धोक्यात घालून एक-एक
पाऊल दरीत उतरत होता.....
दरी खोल अशी नव्हती पण
तरी जीवघेणी मात्र नक्कीच होती....
अजय जस-जसा त्या कार च्या जवळ
पोहचत होता...
तस-
तसा त्या मुलाचा रडण्याचा आवाज
तीव्र होत होता....
अजय आता त्या कार च्या खिडकीजवळ
आला होता...त्याला ते मुल तिथे
रडताना दिसत होते... त्याने
जवळून अंधारात चाचपडत एक दगड
उचलला अणी खिडकी ची काच फोडून
त्या मुलाला बाहेर काढले.... ते मुल
देखील अजय च्या हातात येताच रडायचे
शांत
झाले.... अजय ने त्याला दरीतून बाहेर
काढताना त्याला कारच्या चालकाच्
वर कोण तरी असल्याचे
जाणवले म्हणून त्याने
त्या मुलाला दरीतून बाहेर काढून
मेघा जवळ सोपवून
तो पुन्हा त्या दरीत
अडकलेल्या गाडीत नक्की काय आहे ते
पाहण्यासाठी दरीत
पुन्हा उतरू
लागला....कार जवळ गेल्यावर त्याने
त्या अपघातग्रस्त कार
मध्ये चालकाच्या सीट वर नीट
डोकावून पाहिले...... त्याने जे
पाहिले
त्याच्या हृदयाला धक्का देणारे
होते....त्या सीट वर
एका बाईचा मृतदेह पडला होता... अजय
नीट पाहिले तेव्हा तो अजूनच अवाक्
झाला.तो मृतदेह
त्याच
बाईचा होता....जि त्याच्याकडे
तिच्या मुलाचे प्राण
वाचवण्यासाठी मदत
मागायला आली होती.... त्याने
कसलाही विचार आणि बोभाटा न
करता तो दरीतून वर आल्यावर मेघाने
आजूबाजूला पाहिले
आणि अजयला विचारले कि, "कोण
होती ती बाई??? ती तुझ्याच मागे
आली होती, अचानक कुठे गेली...????"
यावर अजयने एकाच
उत्तर
दिले..... , "ती एक आई होती"

ती.......!

0

ती बोलत तर नाही
तीचे डोळे खुप बोलतात,
मी फक्त पाहात राहतो
पाय आपोआप तीच्याकडे वळतात.
सतत कसला तरी
वीचार करत असते,
काय माहीत तीच्या
मनात काय चालते.
हासतानाही ती खुप
कमी हासु पाहते,
पण हासताना तीच्या
गालावर खळी पडते.
ती उभी असते तीथेच
कुठेतरी मी ही उभा राहतो,
ती जवळ नसली तरी
सहवास तीचा मला जाणवतो.
खरच भीती वाटते
मला तीच्या जाण्याची,
माझ्या कवीतेत पुन्हा
काळोख येण्याची.
ती आली होती प्रकाश
बनुन माझ्या जीवनात,
आता जाणवतो सहवास
तीचा ह्रदयाच्य स्पंदनात.
आता वाटते मला तीनेही
माझ्यावर प्रेम करावे,
फक्त तीच्यासाठी असलेलं
माझे प्रेम एकतर्फी नसावे..
Amit

 

Popular Posts