MARATHI VINOD

फी माफी ची Application
 .
 " आदरणीय सर,
 गोष्ट अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते,
 .
 ... पण मी १०० रु.ची Movie बघितली,
 .
 १५० रु. ची बियर प्यालो,
 .
 ५० रु. चा girlfriend चा mobile recharge केला,
 .
 आणि २०० रु. Science च्या Madam वर शर्यत हरलो, कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर लफडा आहे,
 .
 पण त्यांचा तर लफडा तुमच्या बरोबर निघाला..,
 .
 आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत......
 .
 १. माझी फी माफ....

 २. नाही तर तुमचा पर्दाफाश....!!
 .
 तुमचा आज्ञाकारी.
 .
 तुमचा मुलीचा Boyfriend. .......................                                       





या मुलीं पण विचित्र असतात नं एकदम !!!!!
एक पुरावा देतो मी....
काल मी जेवत होतो, माझ्या गर्लफ्रेंड चा फोन आला आम्ही खूप वेळ बोललो
... तर तेंव्हा मी तिला सोबत जेवायला बोलावले नाही म्हणून ती रागावली आणि फोन ठेवून दिला
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आज मी अंघोळ करत होतो आणि परत तिचा फोन आला
मी कालच्या अनुभवावरून तिला अंघोळीला बोलावले
तरीही ती माझ्यावर रागावली आणि फोन ठेवून दिला
अगदीच विचित्र नं ??




एक चित्ता सिगारेट ओढत होता !
१ उंदीर म्हणाला -"माझ्या बंधू सोड हि नशा , माझ्या सोबत ये , बघ हे जंगल किती सुंदर आहे ."
चित्त्याने विचार केला ,आणि उंदरा सोबत निघाला .

पुढे हत्ती ड्रग्स घेताना दिसला
उंदीर -"हत्ती माझ्या मित्र सोड हि नशा ...."
हत्ती सुद्धा सोबत निघाला
पुढे १ वाघ विस्की चा पेग बनवत होता ,
उंदीर त्याला तेच म्हणाला ...
वाघाने ग्लास बाजूला ठेवला , उंदराच्या ५ -७ कानाखाली वाजवल्या ..
हत्ती -"अरे उंदीर चांगला सांगतोय का मारलेस बिचार्याला ?"
वाघ -"हा हरामखोर जेव्हा जेव्हा देशी पितो ...तेवा असेच बोलतो , ३ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय मी याच्यासोबत !!!"




 काही मुलं वाड्यात क्रिकेट खेळत होती. एकानी बॉल जोरात मारला आणि तो बाबुरावांच्या  घरात गेला. बाबुराव चिडले आणि बाहेर येऊन मुलांना ओरडायला लागले
"काय रे. दिवसभर नुसते खेळता. अभ्यास काही करता कि नाही?"
मुलं बिचारी हो म्हणाली
"मग सांगा बर कुतुबमिनार कुठे आहे?" मुलं काय बोलणार. त्तोंड पडून उभी राहिली.
"कसं माहित असेल? त्या करता बाहेर फिरायला लागत." बाबुराव बॉल घेऊन घरात गेले.
दुसर्या दिवशी पुन्हा बॉल बाबुरावांच्या  घरात गेला. बाबुराव चिडले आणि बाहेर येऊन मुलांना ओरडायला लागले
"काय रे. दिवसभर नुसते खेळता. अभ्यास काही करता कि नाही?" मुलं बिचारी हो म्हणाली
"मग सांगा बर ताजमहाल  कुठे आहे?" मुलं काय बोलणार. त्तोंड पडून उभी राहिली
"कसं माहित असेल? त्या करता बाहेर फिरायला लागत." बाबुराव बॉल घेऊन घरात गेले.
तिसर्या दिवशीही बॉल पुन्हा बाबुरावांच्या  घरात गेला. बाबुराव चिडले आणि बाहेर येऊन मुलांना ओरडायला लागणार इतक्यात एका  मुलांनी  पुढे येऊन बाबू रावांना विचारले
"गणपतराव कोण महितेय्त का?" बाबुराव नाही म्हणाले.
"कसं माहित असेल. त्या करता घरात रहाव लागत!" :D ;) ;D




प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....



भारतात सध्या ४ प्रमुख मोठ्या समस्या आहेत ...

१) लोकसंख्या

.

२) भ्रष्टाचार

.
३) महागाई

.

आणि सर्वात मोठी समस्या

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
४) तरुणांना प्रत्येक आठवड्यात होणारे अगदी खरे खरे... प्रेम....




   शेजारी : प्लीज, मला रविवारपुरता तुमचा तबला द्याल का?

 तबलजी : माझं वादन ऐकून तुम्हालाही आवड निर्माण झाली वाटतं?

 शेजारी : नाही हो! किमान सुट्टीदिवशी तरी मला शांतपणे झोपायचंय.....




काही मजेशीर व्याख्या
तुम्हाला कोणती आवडली ते सांगा ???

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- वरच्या मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा का

गंपू आणि झंपू जंगलात फिरत असतात. तेवढ्यात त्यांच्यासमोर वाघ येतो. दोघांची पाचावर धारण बसते. तेवढ्यात प्रसंगावधान राखून गंपू जमिनीवरची धूळ उचलून वाघाच्या डोळ्यात फेकतो आणि म्हणतो, 'पळ, पळ!' झंपू उत्तरतो, 'मी कशाला पळू? धूळ तू फेकलीस!' 


 झंप्या आणि गंप्या बॉर्डरवर जातात. झंप्या अंगावर मच्छरदाणी घेतो.

 गंप्या : अरे, हे काय? बुलेटप्रूफ जॅकेटएवजी हे रे काय घातलेस?

 झंप्या : अरे यार, डोन्ट वरी..ज्यातून एक डास आत घुसू शकत नाही, त्यातून गोळी कशी आत शिरणार रे!



Kolaveri di - Marathi Translation

[ ह्या सध्या गाजत असलेल्या गाण्याचे मराठी रुपांतर करण्याचा प्रयत्न ]

मित्रांनो ऐका आता माझे गाणं
तुटलेल्या हृदयाचं नाकाम गाणं

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
.
.
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? .
.
.
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

दूर असतो चंद्र...चंद्र...चंद्र तो शुभ्र...
शुभ्र चंद्राआड रात्र...रात्रीचा रंग ब्लैक

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

गोरीपान मुलगी...मुलगी...मुलीचे हृदय ब्लैक...
नजरेला मिळाली नजर..फ्युचर माझे डार्क...

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?

pa pa paan pa pa paan pa pa paa pa pa paan

हातात ग्लास...ग्लासात स्कॉंच...डोळ्यात अश्रू भरपूर
खाली आयुष्य...आली मुलगी...आयुष्य रिवर्स गिअर

माझी प्रिये...माझी प्रिये...दाखविलेस तू खरे रंग...
गेली कुठेस...माझी प्रिये...जीव झाला कासावीस..
प्राण आला कंठी माझा...देवा बघते कशी ती हसून..

हे गाणं नाकाम मजनूंच
नाही काही आम्हा पर्याय

का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू?
का असे छळतेस...छळतेस...छळतेस...मला तू? :p ;) :D


वो गर्मियो कि शाम,
वो लक्ष्मी रोड का ट्राफिक जाम,
वो खडकवासला कि हवा,
वो बी जे मेडिकल कि दवा,
वो सर्दियो कि ठंडक,
वो क्लासरूम का मजा,
वो चितळे कि बाकरवडी,
वो तुळशी बाग मे शॉपिंग,
वो लेट रात कि पढाई,
वो चाचा हलवाई कि मिठाई,
वो डेक्कन कि कच्ची दाबेली,
वो के एन पी कि कॅड बी,
वो जोशी का वडा पाव,
वो रूपाली कि चाय,
वो Z ब्रिज के नजारे,
वो F C कि सडके जहा दिल है धडके,
वो A BC कि किताबे,
वो दगडूशेठ का मंदिर,
वो सारस बाग कि भेल,
वो मस्ती कि बाते
ऐसी है कूच पुणे कि यादे.
 
:)


चिंगूच्या कॉलेजचा पहिलाच दिवस असतो. फॉर्म भरण्याचं काम सुरू असतं.

सगळे रकाने भरता भरता चिंगू 'कायमचा पत्ता' या रकान्यापाशी थांबतो. 

थोडा विचार करतो.. आणि लिहितो..कायमचा पत्ता : फेसबुक डॉट कॉम.



पुणेरी " संस्कृतीचे आक्रमण "मॅकDonald वर" झाले तर

1. आमचे येथे बर्गर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
4. कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
5. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
6. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)
8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.
10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
11. विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.
12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
16. आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.

- हुकूमावरून


एकदा शरद पवार,राजा आणि कलमाड़ी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते

पवार १००रु.ची नोट खाली टाकतात.आणि म्हणतात..

"मी एका गरीब भारतीयाला सुखी केले"

मग राजा ५०रु च्या दोन नोट टाकतात आणि म्हणतात..

"मी दोने गरीब भारतीयाना सुखी केले"

मग कलमाड़ी १रु च्या १००नाणी टाकतो आणि म्हणतात..

"मी १००गरीब भारतीयाना सुखी केले"

हे ऐकून पायलट म्हणतो
"मी तुम्हा तिघाना टाकुन देईन आणि १२५कोटि भारतीयाना निरंतर सुखी करेन"
आणि ते पायलट होते


"आपले अन्ना हजारे*."
*असे आपण गृहित धरू. ;)1.

चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं?

नन्या : गांधीजींचा जन्म झाला.

चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं?

नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!

2.
चौखुरे गुरुजी वर्गाला उद्देशून म्हणाले, ''बाळांनो, वर्गात जर कुणाला सुसु लागली असेल, तर त्याने करंगळी वर करावी.''

नन्या एकदम 'ट्टॉक' करून उद्गारला, ''आयला, गुरुजी, करंगळी वर केली की थांबते सुसु?!!!!''


3.
शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?
चिन्टु : हो
शिक्षक : कोणत्या ?
चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .

4.
शिक्षक : बादशहा अकबर ने कुठ पर्यंत राज्य केले ?

चिन्टु : पान नं. १७ ते ४२.

5.
दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.

डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?
अण्णा : डॉ. देशपांडे.
डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.
तुम्हाला कोणता दिला?
अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा.......




निबंधः  माझे आवडते पेयः "चहा"

        मी रोज चहा पितो. चहा प्यायल्या शिवाय माझा दिवस सुरू होत नाही.
चहा प्यायल्या वर फ्रेश वाटत. फ्रेश वाटल की झोप भुर्रSSSSS जाते.मी पण
सुट्टीत भुर्रS जाणारे ट्रिपला. ट्रिपला गेलो तरी चहा लागतो.  माझा भाऊ कॉफी
पितो.तो म्हणतो कॉफी जास्त रिफ्रेशीग असते. मग आम्ही भान्डतो.सिरीयल
मधल्या बायका पण सारख्या भान्डत असतात.पण त्या चहा पित नाही भान्डत.
मी चहा पित भान्डतो.चहा काळा असतो पण दूध घातलं की लाईट ब्राऊन होतो.
माझा कुत्रा काळा आहे.पण त्याने दूध प्यायले तरी तो काळाचं राहतो.याला म्हणतात
जादु. जादु नावाचा एक एलियन ह्रितीक बरोबर राहायचा.तो ऊन प्यायचा आणि ह्रितीक
बोर्नव्हिटा प्यायचा.पण मी चहाचं पितो.मला चहा खूप आवडतो.
आता तुम्हीही चहा प्या आणि मला पण पियु द्या..................



एक कवी कविता ऐकवित होता.
पण तो जसा कविता सांगायला सुरवात करीत असे त्याच्या तोंडातली कवळी बाहेर यायची.
असं बराच वेळ चालत राहालं.
शेवटी कंटाळून एक श्रोता म्हणाला, "ओ महाशय काही कविता सांगता की नुसती कॅसेटच बदलत राहाता."

प्रिये ,
वडापाव दिसला की , मला तुझी आठवण येते. मग मला सांग, वडयाशिवाय पावाला म्हणजे माझ्याशिवाय तुला कसे रहावेसे वाटेल?
वड़्याशिवाय पावाला चव नसते. पावाशिवाय वड़्याला चव नसते. शेवटी वड़्याला पावात विलीन व्हायलाच लागते.
त्याचप्रमाणे तुझे आणि माझे मिलन झाल्याशिवाय आपल्या प्रीतीला चव कशी येईल? पत्र संपवतो. कारण माझा वडापाव आता खावून संपला आहे. पत्रावे उत्तर देखील वटाट़्याने भरलेल्या समोशासारखे देणे.

तुझा फक्त तुझाच
वडा...........