MARATHI VINOD-2

मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्याने एका मुलीला कीसकेले
मुलगी - (रागाने) हे काय आहे ?
मुलगा - हे डायरेक्ट मार्केटिंग आहे
मुलगी त्या मुलाच्या कानशिलात वाजवते
मुलगा - (रागाने) हे काय आहे ?
मुलगी - हा कस्टमर फीडबॅक आहे


**************विनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका*************

अ) १ ) …. थोडक्यात उत्तरे लिहा ….

प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.

... प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.

प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.

प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी

प्रश्न – कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर – अमिताभ बच्चन.

प्रश्न – उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर – उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.

प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.

प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.

प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.

प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.

प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.

ब ) १ ) प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे २ उदाहरण सांगा ?

उत्तर १ – अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब?
उत्तर २ – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.

क ) १ ) अपूर्ण गाणी/म्हणी पूर्ण करा. ….

प्रश्न – देखा है पहली बार ……………
उत्तर – उद्धव के घरमे पवार… कसके पकड़, कसके पकड़.

प्रश्न – पाण्यातला मासा झोप घेतो कैसा …………
उत्तर – खावे त्याचा रस्सा तेंव्हा कळे .
…………………………
ड) व्याख्या करा .

१) प्रकाशवर्षाची व्याख्या करा .
उत्तर – अनवाणी पायाने प्रकाश एका वर्षात जेव्हड़े अंतर पायी-पायी चालत जातो त्या अंतरास प्रकाश वर्ष म्हणतात.

२) महागाईची व्याख्या करा ….
उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त
चारा खावून कमी दुध देतात त्यांना
महागाई म्हणतात.

क ) १) तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर -
…….. काय झालं ?
…….. बाळ रडत होतं.
…….. एक कानशिलात दे त्याच्या.
…….. तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.

ख ) १ ) अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. ….

प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब ……………
उत्तर – नालायक है.

प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे …………
उत्तर – भरा करो.


१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
  २.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
  ३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.
४. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.
५. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी
६. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....
६. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे....

७ . तुला काय वाटत मला चढली आहे?
८. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...
९. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......
१०. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
  ११ . यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..
  १२. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...
  १३ . कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...
  १४ . तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है ???
  १५.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
  १६. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का...
  १७  य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
१८. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...
१९. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि 

रजनीकांतबद्दलचे जोक्स रजनीकांतबद्दल इतके  असंख्य जोक्स आहेत  की, विचारता सोय नाही.
  हे जोक्स त्याच्या चाहत्यांनी त्याचा मोठेपणा अधिक वाढवण्यासाठी जन्माला घातले आहेत
  की, त्याची थट्टा करणा-यांनी त्याला विनोदाचा विषय  करण्यासाठी हे सांगणं कठिण आहे.
  पण या  जोक्समधून रजनीकांत ही  नेमकी काय चीज  आहे हे  मात्र नेमकेपणाने उभं  राहातं.
  कुठल्याच फिल्मस्टारबद्दल त्याच्या पडद्यावरील शैलीचा आधार  घेऊन अशाप्रकारे जोक्सचा
  जन्म झालेलं पाहण्यात नाही :
 
  •रजनीकांत ज्यावेळी पुशअप्स मारतो, त्यावेळी तो स्वत:ला  वर उचलत  नाही, तर पृथ्वीला
  खाली ढकलत  असतो
 
  •मोनालिसाच्या ज्या हास्याबद्दल जगभरात अजूनही गूढ  आणि आकर्षण आहे,  हे हास्य
  साक्षात रजनीकांतनेच तिला दिलंय
 
  •रजनीकांत कुठल्याही संख्येला शून्याने भागू  शकतो
 
  •रजनीकांत माशालाही पाण्यात बुडवून मारू  शकतो
 
  •रजनीकांतने एकदा  एका घोडय़ाच्या हनुवटीला लाथ  मारली होती. आज  त्याच्या वारशांना
  आपण जिराफ म्हणून ओळखतो
 
  •रजनीकांतने एकदा  मॅकडोनाल्डमध्ये इडलीची ऑर्डर दिली आणि.. त्याला ती मिळाली!
 
  •बम्र्युडा ट्रँगल म्हणून ओळखला जाणारा भाग पूर्वी बम्र्युडा स्क्वेअर होता; पण
  रजनीकांतने एका  कोप-याला  लाथ मारली आणि..रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमच्या
  गळ्याभोवती फास  आवळून तुमचा जीव  घेऊ शकतो
 
  •रजनीकांत श्वास घेत नाही. आसमंतातली हवा संरक्षणासाठी त्याच्या फुफ्फुसांमध्ये
  लपून बसलेली असते
 
  •रजनीकांत यापूर्वीच मंगळावर जाऊन आलाय; म्हणून  तर तिथे  सजीवसृष्टीचं अस्तित्व नाही
 
  •रजनीकांत रोखून पाहतो,  तेव्हा पाणी  अधिक वेगाने तापतं
 
  •गुगलवर रजनीकांतला शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. कारण  कोणीच रजनीकांतला शोधू
  शकत नाही; रजनीकांतच  आपल्याला शोधून काढतो
 
  •टेलिफोनच्या आन्सरिंग मशिनचा बीप वाजण्याआधीच रजनीकांत तिथे आपला संदेश नोंदवू
  शकतो
 
  • रजनीकांत न्यायालयात जातो आणि.. न्यायाधीशालाच शिक्षा सुनावून येतो
 
  • रजनीकांतला लहानपणी देवी  झाल्या होत्या. म्हणूनच आज देवीचं नामोनिशाण दिसत नाही
 
  • रजनीकांतच्या कॅलेंडरमध्ये 31 मार्चनंतर एकदम 2 एप्रिलच येतो  कारण.. त्याला
  कोणीही 'एप्रिल फूल'  बनवू शकत  नाही
 
 
  • रजनीकांत घडय़ाळ घालत नाही कारण..  किती वाजलेत ते तोच तर  ठरवतो
 
  • मृत्यूला कोणीही फसवू शकत नाही, हे  विधान म्हणजे रजनीकांतला स्वत:चा अपमानच
  वाटतं. कारण  तो क्षणोक्षणी मृत्यूला फसवत असतो
 
  • पुरातत्त्ववेत्यांनी 1236 सालची एक  इंग्लिश डिक्शनरी शोधून काढली. त्यात
  'व्हिक्टिम' या शब्दाचा अर्थ 'ज्याचा रजनीकांतशी सामना झाला आहे तो' असा  आहे
 
  • ग्लोबल वॉर्मिग नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाही. रजनीकांतला थंडी वाजत होती,
  म्हणून त्याने सूर्याला थोडं पृथ्वीच्या जवळ आणलं

yanna Raskala...... माईंड इट!!!!!