facebook cha ghost(भूत फेसबुकचे)

0

कॉलेज ला सुटी असल्याने पूजा निवांत होती....
सकाळी कॉफी चा मग घेऊन ती कम्प्युटर च्या टेबलावर आली अन डेस्क टॉप चालू केला..
फेस बुकच्या अकौंटर गेली अन पोस्ट वाचू लागली ..
डाव्या कोप~यात नजर गेली अन कुणाची तरी मैत्री विनंती आलेली तिला दिसली..
तिने क्लीकले व फोटोवर क्लीकून त्या अकांऊंट वर गेली...
राहुल पानसे नी ती मैत्री साठी विनंती केली होती.....सॉफ्टवेअर इंजिनिअर..राहणार पुणे ..सद्ध्या फरीदाबाद...पूजा वाचत होती..
तिने त्याचे मित्र चेक केले बरेचसे मित्र पुण्यातलेच होते एकूण १५-२० मित्रांची यादी होती..
पूजा विचारात पडली की याने ओळख नसताना का मैत्री याचना केली असेल?
फोटो तर खरा वाटत होता..एकदा वाट्ले मैत्री स्विकारावी पण फेस बुकावरचे सध्याचे वातावरण, कुणीच सामाईक मित्र नाही .त्या मुळे तिने ति रिक्वस्ट डीलिट केली..
जसे तिने डीलीट वर क्लीकले, अन एकदम मोझिला वेब पत्र थरथरू लागले..निमिषार्धात तो वेग वाढला अन एक विचित्र आवाज आला अन संगणक ह्यांग झाला ...
"आले वाटते याच्या अंगात"..वैतागून पूजाने संगणक बंद केला व पुन्हा री बुट केला..
विंडो चा लोगो आला अन परत कोंम्प बंद ..शेवटी थोडी खटपट केली पण संगणक हटून बसला होता अन वैतागून पूजाने सर्व्हिस इंजिनिअरला फोन केला..
थोड्या वेळातच तो आला व कोंम्प चेक केला अन म्हणाला "बहुतेक व्हायरस शिरला आहे..फोर्म्याट करून परत विंडो लोड करून देतो"
हो म्हणण्या शिवाय तिला पर्याय नव्हता...त्याने परत विंडो लोड केली इंटर नेट कनेक्शन लावले व कोम्प सुरू झाला..
कश्या मुळे झाले असेल असे? पुजाने विचारले .."होते काही वेळा एखादी अनोळखी लिंक क्लीकली का?..
पूजाने राहुल च्या अकाऊण्ट ची लिंक क्लीकाली असे म्हणताच तो हसला व .त्या वर म्हणाला मला नाही वाटत हे कारण असावे....
वेट ..म्हणत तिने फेस बुकाचे पान उघडले व तिच्या अकाउंट वर गेली अन चकित झाली..
परत मैत्रीची रिक्वेस्ट आली होती ..तिने पाहिले ती राहुल चीच होती..
तिने इंजिनिअरला सांगितले की तू आता हि विनंती नकार ,,कारण मी नाकारल्या वर कोम्प ह्यांग झाला होता....
"अस काही नसत" असे म्हणत जसे त्याने डीलीट लिंक वर क्लीकले, अन तसे एकदम मोझिला वेब पत्र थरथरु लागले..निमिषार्धात तो वेग वाढला अन एक विचित्र आवाज आला अन संगणक ह्यांग झाला ..
हे पाहिल्यावर इंजिनिअर पण हादरला...व म्हणाला "हा पोरगा भारी दिसत आहे त्याने व्हायरस लिंकला जोडला असावा"..
"मी आमच्या सराशी बोलतो"..पण सरांचा फोन लागेना..त्याने परत फॉर्म्याट करून विंडो लोड करून दिली ..तेव्हढ्यात सरांचा फोन आला त्यांनी सारे ऐकले व उद्या येतो असे सांगत पुजाला ती लिंक न क्लीकाता कोम्प चालव असे सांगितले..
खर तर पूजा खूप चिडली होती व तिने ह्या राहुल ची तक्रार सायबर पोलिसात द्यायची असे ठरवले ....
पण ति परत त्या अकाउंट वर गेली..व नेमका काय प्रकार आहे तो पाहण्यासाठी त्याच्या लिस्ट मधल्या पुण्याच्या अभिजित दातार ला मैत्री विनंती पाठवली व आपला फोन नंबर दिला व फोन कर असा मेसेज दिला...
पूजांची मैत्री विनंती आलेली पाहिल्यावर अभिला पण कळत नाही..पण फोन नंबर असल्याने तो उत्सुकते पोटी फोन ;लावतो..
"हाय"..पुजाचा आवाज येतो व सायंकाळी ७ च्या सुमारास डेक्कन वरच्या सी.सी.डी वर भेटण्याचे ठरते...
का? असे अभिजित विचारत असतो पण भेटल्यावर बोलु असे पुजा म्हणते...
अभिजित भेटल्यावर प्राथमिक स्वरूपाचे बोलणे होते व पुजा सरळ विषयाला हात घालते व विचारते..
"तुझा मित्र राहुल पानसे कसा मुलगा आहे??"
तिच्या प्रश्नाने अभिजित गडबडतो व विचारतो का? काय झाले नेमके?
त्यावर पुजा त्याला झालेला प्रकार सांगते ..ते ऐकून मात्र अभिजित चकित होतो व तिला सांगतो की असे होणे शक्य नाही..
का शक्य नाही?..पुजा ने त्याला विचारले..मुले मैत्री साठी काही हि करू शकतात."
ते बरोबर आहे पण राहुल असे करू शकत नाही कारण तो आता या जगात नाही..त्याला जाऊन आता ६ महिने होतील..अभि म्हणाला..
काय??? आता चकित होण्याची वेळ पुजाची होती.व चर्चेतून तिला कळले ते असे होते.
राहुल अभिजित चा बाल मित्र,इंजिनिअर झाल्यावर त्याला दिल्लीतल्या एका कंपनीत नोकरी लागली..पगार पण चांगला होता.
पण तो फरिदाबादला रहात होती अन मोटार सायकल वरुन ऑफिस मध्ये ये जा करीत असे.एकदा कामावरून तो उशिरा सुटला अन वाटेतच त्याला एका ट्रक ने उडवले..ट्रक चा धक्का इतका जोरदार होता की राहुल बाजुच्या खड्ड्यात जबर दुखापद होऊन मोटार बाइक समवेत पडला व तात्काळ गतप्राण झाला..
३-४ दिवस राहुल ऑफिस मध्ये आला नाही म्हणून चौकशी सुरू झाली..घरमालकाने पण तो घरी आला नसल्याचे सांगितले...
पुण्याला घरी फोनाफोनी झाली अन पुण्याला पण तो आला नसल्याचे कळल्याने शेवटी ऑफिस च्या लोकांनी पोलिसात तक्रार केली शेवटी शोधाशोध केल्यावर राहुलची बॉडी मिळाली..
पोलिसानी व कंपनीच्या लोकांनी पुण्यास हि बातमी कळवली..राहुल ला बाबा नव्हते..एकुलता एक मुलगा आईने वाढवला होता साथ भावाची चंदुमामाची ..
आईवर तर आकाश कोसळले.चंदुमामा दिल्लिस आला..बॉडी ची दशा झाली होती..पोलिसांच्या सल्ल्याने दिल्लीला च दहन करण्यात आले...त्याच समयी चंदुमामास फोन आला की आईस हॉस्पिटल मध्ये भरती केले आहे..त्या साठी चंदुमामा उलट पावली पुण्यास आला...
अभिजित ने हे सारे पुजास सांगितले...
"मला चंदुमामाचा पत्ता मिळेल का?" पुजाने विचारले
"हो मिळेल ना..आई व मामा एकाच सोसायटीत शेजारी शेजारीच राहतात" अभि म्हणाला व तिला पत्ता व फोन न दिला..
दुस~या दिवशी पुजा चंदुमामास भेटायला गेली व तिने तिच्या बाबत घडलेला प्रसंग मामास सांगितला.तो ऐकून चंदुमामा चाट झाला.
यावर पुजाने त्यांना मी यावर उपाय शोधते..पण तुमचे सहकार्य हवे अशी विनंती केली..
नक्की मिळेल" असे मामाने सांगितल्यावर पुजाने निःश्वास सोडला..
हा सारा प्रकार अमानवि आहे हे पुजाने ओळखले होते व त्यावर उपाय प.पु त्रिनेत्र कर्मण्यित[अ‍ॅक्टिवेटेड] ढ्गे महाराज हेच सांगु शकणार..
प.पु त्रिनेत्र कर्मण्यित[अ‍ॅक्टिवेटेड] ढ्गे महाराज हे स्वामी म्हणजे कलियुगातील चमत्कारच ...भूत वर्तमान भविष्य त्याना काळत असे तिसर्या नेत्राच्या साहाय्याने
पुजा ला त्यांनी अनुग्रहित केलेले होते..कारण तिची मागच्या जन्माची पुण्याई..असे मोजकेच बाबांचे शिष्य होते..
पुजा आश्रमात गेल्यावर बाबांची भेट झाली ..
बोल बेटा..आज आमची आठवण आली..बाबा हसत म्हणाले.
यावर पुजाने सारा किस्सा सांगितला.
क्षणार्धात बाबा ध्यानात गेले डोळे उघडले व बाबा म्हणाले..राहुल चे पिंडदान केले गेले होते का?
पुजा गडबडली व तिने चंदुमामास फोन लावला.व विचारले...नाही बाबा पिन्डदान नाही झाले ..पूजा म्हणाली
या वर बाबा हसले.."बालिके..राहुल च्या अत्मास मुक्ती मिळाली नाही त्याचा सूक्ष्म देह अवकाशात मुक्तीसाठी घिरट्या घालत आहे व त्याने तुझ्या अकाउंटला हॅक केले आहे.." हे ऐकल्यावर पुजा हादरली ..ते पाहून बाबा म्हणाले "घाबरू नकोस तू सर्वपितरे पिंडे गुरुजीस जाऊन भेट व पिंडदान विधी संपन्न कर..माझे नाव त्यांना सांग"
हे ऐकल्यावर पुजाच्या जिवात जीव आला...
पुजाने हे सारे चंदुमामा बरोबर चर्चिले व मामा पण तयार झाले.
पुजाने सर्वपितरे पिंडे गुरुजीची गाठ घेतली व दिवस नक्की केला...
विधीसाठी पुजा मामा व राहुल चे काही बाल मित्र उपस्थित होते..सर्व क्रिया झाल्यावर गुरुजीने पिंड कट्ट्यावर ठेवले.व सारे जण काकस्पर्श पिंडास कधी होतो याची वाट पाहत होते पण पिंडास कावळा शिवेना..
"बहुतेक आत्म्याच्या काही इच्छा राहिल्या असाव्यात वा त्याला काळजी वाटत असावी आईची" ..गुरुजी म्हणाले.
तुम्ही आत्म्यास आवाहन करा ..
मामा हात जोडत आकाशाकडे पहात म्हणाले "राहुल तू आईची काळजी करु नकोस मी तिचा सांभाळ करेन....पण कावळा पिंडास शिवेना...मित्रानी पण काहि मैत्रीत चुका झाल्या असल्यास माफ कर असे आत्म्यास आवाहन केले पण कावळा पिंडास शिवेना...
शेवटी पुजाने हात जोडले व म्हणाली.."राहुल तुझी मैत्री स्वीकारली नाही या बद्दल मला माफ कर..तुझा आत्मा मुक्त झाल्यावर तू पुन्हा जन्म घेशील व कोणत्याही रूपात येशील तेव्हा मी तुझ्या मैत्रीचा नक्कीच स्वीकार करीन..आपण चांगले मित्र होऊ...असे मी तुला वचन देते...मात्र तू तुझा डी.पी बदलू नकोस "
असे म्हणाल्यावर चमत्कार झाला नदीच्या काठावरचा कावळ्यांचा थवा आला अन पिंडास शिवला..."
राहुलचा आत्मा मुक्त झाला होता.
घरी आल्यावर पुजाने अंघोळ केली अन फेस बुकावरच्या अकाउंटवर गेली ..
राहुलची मैत्रीची रीक्वेस्ट दिसत नव्हती..राजुलचा आत्मा मुक्त झाला होता
आता तिचा कंप्युटर छान चालतो..(from misalpav)