भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.

0

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता. 

माणसांच्या गर्दीत 
हरवून बसला माझा भाऊ 
सांगा ना त्याला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

एकुलता एक दादा 
त्याला जिवापाड जपला 
लग्न झाल्या पासून 
वाहिनी च्या पदरा आड लपला 
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ 
सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

नको दादा साडी मला 
नको पैसा पाणी 
तुझ्या सूखा साठीच 
देवा ला करते विनवणी 
सांग तुला कोणत्या रंगाचा  शर्ट घेऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. .... 

काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते 
तळ हातावरले फोड बघून 
तूझी आठवण येते 
दादा चढउतार होतात जीवनात 
तू घाबरुन नको जाऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

उचलत नाहीस फोन म्हणून 
वहीनीला केला 
Wrong नम्बर करत 
कट त्यांनी केला 
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ 
दादा सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

आई बाबा सोडून गेले 
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ 
डोळ्यामधी आले 
वाईट वाटते शेजारी येतात  जेव्हा त्यांचे भाऊ 
सांग ना तुला 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....

नको मला जमीन 
नको घराची वाटणी 
आवडीने खाईन 
भाकरी आणि चटणी 
काकूळती ला आला जीव 
मनात राग नको ठेऊ 
दादा सांग ना रे 
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ ..... 
😢😢😢😢 😔😔😔😔
आवडली तर नक्की शेयर करा🙏


🌺"साद आईची"🌺

0

🌺"साद आईची"🌺

महिनेमागून महिने,
शेवटी वर्ष सरुन जाते
वृध्दाश्रमाच्या पायरीवर ,
वाट तुझी पाहाते

भिजून जातो पदर ,
अन मन रिते राहाते
कधी मधी मात्र ,
तुझी मनीऑर्डर येते

पैसे नकोत यावेळी ,
तूच येऊन जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा

तुझा बा होता तोवर ,
काळ बरा गेला
तुझी आठवण काढत ,
उघड्या डोळ्यांनी गेला

शेवटपर्यंत सांगत होता,
 लेक माझा भला
तू मोठा साहेब,
त्याचं मोठं कौतुक त्याला

माझ्याही ह्रदयात फोटो,
 तुझा तू पाहून जा
बाळा मला तुझ्या ,
घरी घेऊन जा.

दुष्काळाच्या साली ,
जन्म तुझा झाला
तुझ्या दुधासाठी ,
आम्ही चहा सोडून दिला

वर्षाकाठी एक कपडा,
 पुरवून-पुरवून घातला
सालं घातली बापाने,
पण तुला शाळेमधी घातला

हवं तर तू हे ,
सगळं विसरुन जा
पण बाळा मला ,
तुझ्या घरी घेऊन जा.

धुणी-भांडी करीन मी,
केरकचरा भरीन मी
पुरणपोळ्या, अळुवड्या ,
तुझ्यासाठी रांधीन मी

नातवंडांचं दुखलं-खुपलं ,
सगळं बघेन मी
घाबरु नकोस, त्याची आजी ,
असं नाही सांगणार नाही मी

तुझ्या घरची कामवाली ,
म्हणून घेऊन जा
पण बाळा मला
तुझ्या घरी घेऊन जा.

थकले रे डोळे बाळा,
प्राण कंठी आले
तुझ्याविना जगणे
आता मुश्किल झाले

विसरु कशी तुला मी,
तुझ्यामुुळे आई झाले
बाळ माझं 'कुलभूषण'
पोरकी मी का झाले?

आता माझ्या थडग्यापाशी
'आई' म्हणून जा
जमलंच तुला तर
हा वृध्दाश्रम पाडून जा.

एकदा तरी सिविल इंजीनियर वर प्रेम करुन पहा

0

सिविल इंजीनियर म्हणजे काय ………

सिविल इंजीनियर म्हणजे फीरता वारा

 सिविल इंजीनियर म्हणजे वाहता झरा।
सिविल इंजीनियर  म्हणजे रात्री एकटाच
अंधारात चमकनारा तारा।।

 सिविल इंजीनियर   अंगावरील शहारा
       सिविल इंजीनियर रात्रीचा पहारा।
       फक्त  सिविल इंजीनियर आहे
       सुख अन दु:खाचा सहारा।।

सिविल इंजीनियर जन हिताचा नारा
सिविल इंजीनियर आहे अनमोल हिरा।
सिविल इंजीनियर   म्हणजे धाक दराराv
       त्याचाच आहे वचक सारा।
       काहीही करु शकतो सिविल    इंजीनियर
       जर असेल तो नितीनं खरा।।

सिविल इंजीनियर  प्रेम करुन पहा

एकदा तरी  सिविल इंजीनियर वर
प्रेम करुन पहा।
मनापासुन त्याच्यावर
तुम्ही मरुन पहा।।

         जीवाला जीव देईल तुमच्या
         त्याचा हात धरुन पहा।
         त्याचं नाव काळजावर
         एकदातरी कोरुन पहा।।

कसा जगतो एकटा
तुम्ही चोरुन पहा।
प्रेमाचे दोन शब्द
त्याच्याशी बोलून पहा।।

          त्याच्या सारख्या यातना
         एकदा तरी सोसुन पहा।
          अनोळखी जगात तुम्ही
           एकटे बसुन पहा।।

दु:ख असुन मनात
तुम्ही हसुन पहा।
त्याच्या सारखे तुम्ही
ऊन्हात ऊभे राहुन पहा।।

         एकदा तरी सिविल इंजीनियर वर
          प्रेम करुन पहा।
          तो रोज मरतो तुम्ही
          एकदातरी मरुन पहा।।

लेकरासाठी झुरतो तो
तसं भेटीसाठी झुरुन पहा।
तुम्हाला काय वाटतं तुम्ही
सिविल इंजीनियरच्या यातना सोसुन पहा।।

     एकदा तरी  सिविल इंजीनियर वर
          तुम्ही प्रेम करुन पहा……
 

Popular Posts