AK AJAB PREM KATHA!!!!

0

एक अजब प्रेमकहाणी:
मुंबईत वावरलेली निशिता एक चांगली लेखिका होती.तिला एक नोवेल(कादंबरी) लिहायची होती पण विषय मिळत नव्हता.कदाचित तो विषय तिला तिच्या मुळ गावात मिळु शकतो या आशेने ति जंगमवाडीला येत होती.तिचे वडील जंगमवाडीचे देशमुख होते.घोडागाडीची चाके गावाकडे हळुहळु सरकत होती.तसतशी गावचं वेगळेपण तिला जाणवत होतं.वीस वर्षाँच्या मोठ्या अंतरानंतर ती गावी येत होती.अचानक एक वेडा कुठुनतरी आला आणि तिच्या हातात असलेली एक प्रसिद्ध कादंबरी हिसकावुन घेऊन गेला.टांगा थांबवुन ती त्या वेड्याचा शोध घेऊ लागली पण,फाटलेले कपडे,वाढलेले केस दिसायला बावळट असणारा असा तो वेडा कुठे गायब झाला ते कळलंच नाही.अचानक तिला कोणीतरी हाक मारली,त्या दिशेने पाहीलं तर एक बाई तिला आवाज देत होती.ती बाई तिच्याजवळ आली.आणि म्हणाली,तुम्ही निशिता ताई ना?
हो..
मी रंजना,देशमुख साहेबांच्या इथेकाम करते.तुम्हाला घ्यायला साहेबांनी मला धाडलंय.कुठायत तुमच्या बॅगा,सामान?
टांग्यामध्ये आहेत.
रंजनाने निशिताचं राहण्याचं सगळं सामान घेतलं आणि तिला देशमुख वाड्यावर घेउन गेली.वडीलांसोबतच्या थोड्या वेळच्या गप्पा झाल्यावर निशिताने आपला ईथे येण्याचा हेतु सांगितला.वडीलांनी तिच्या हेतुला सहमती दर्शविली,आणि रंजनाला तिला सोबत राहायला सांगितलं.एक दिवसाच्या विश्रांतीनंतर निशिता रंजनाला घेऊन बाहेर पडली.गावाजवळुन वाहणारी नदी,सुंदर रान,झाडे बघुन निशिता मोहुन गेली.पण अचानक एका जागी येऊन ती थांबली.कारण एका झाडावर बदाम कोरलं होतं.ज्यामध्ये दिपक आणि विणा अशी नावे कोरली होती.निशिताने रंजनाला या गोष्टीबद्दल विचारले.ती म्हणाली,यामागे एक प्रेमकथा आहे.
.
निशिता म्हणाली,मग सांगना.
ती सांगु लागली,
एक चार पाच वर्षापुर्वीची गोष्ट आहे.ज्यावेळी विणा आणि दिपक एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.ते दोघे याच गावातले.रोज संध्याकाळी ज्यावेळी सुर्य बुडत्याला असायचा त्यावेळी ते एकमेकांना इथे भेटायला यायचे.दिवसभर घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी ते सांगायचे.एक दुसर्याचं दुःख वाटुन घ्यायचे आणि सुखही.विणा आणि दिपक यांना आपलं आयुष्य हळुहळु एकमेकांशिवाय अधुरं वाटु लागलं होतं.हळुहळु त्यांच्या प्रेमाची चर्चा गावागावात रंगु लागली.विणाच्या बापापर्यँत बातमी पोहोचली.त्याने तिचं बाहेर येणं जाणं बंद केलं.गाठीभेटी बंद झाल्या.एकमेकांसोबत ते आठवणीतच बोलु लागले.आणि त्यातच भर म्हणजे दिपकचं बारावीपर्यँतचं शिक्षण पुर्ण झालं होतं,पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात जावं लागणार होतं.त्याच्याजवळ एक दिवस होता,त्याने विणाला एका छोट्या मुलीकडुन निरोप धाडला.विणा त्या सायंकाळी बाबाची नजर चुकवत. कशीबशी आली होती.त्याने तिला सर्व हकीकत सांगितली,दोघांनी एकमेकांना लग्नाचं वचन दिलं.आणि एक आठवण म्हणुन त्यांनी या झाडावर बदाम कोरलं आणि ज्यात आपली नावे लिहीली.भरलेल्या डोळ्यांनी त्यांनि विरह स्वीकारला.
इतकी कथा ऐकुन निशिताचा उत्साह वाढला होता,ती म्हणाली,मग पुढे काय झालं?
पुढे मग दिपक शहरी निघुन गेला.तिकडुन तो विणाला वेळोवेळी पत्रे पाठवु लागला,आणि विना देखील पत्रे पाठवायची.एक दोन वर्षांनंतर विणाची पत्रे यायची बंद झाली.दिपकच्या पत्राला उत्तर येत नव्हतं.विणाचं पत्र येऊन तीन महीन्यांच्या वर वेळ झाला होता.दिपकचा जीव कासावीस झाला होता.तो तातडीने गावी निघुन आला.आल्या आल्या तो विणाच्या घरीच गेला पण तिथे गेल्यावर त्याला जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसला.कारण त्याला कळलं कि विणाचं लग्न झालं आहे आणि तिला दुर कोणत्या तरी गावी दिलं आहे.त्याला हे कळतांच तो स्वतःला सावरु शकत नव्हता.त्याच्या मनात हजार प्रश्नांनी गर्दी केली होती.पण त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला विणा इथे नव्हती.तो गावातल्या आपल्या पुर्वीच्या घरी गेला.
पुढची कथा रंजना निशिताला ऐकवणार तेवढ्यात वाड्यावरचा नोकर देशमुख साहेबांचा निरोप घेऊन आला,संध्याकाळ झाली आहे ताईसाहेब,काकासाहेबांनी सांज व्हायच्या आत दोघीँना वाड्यावर बोलावलंय..असं सांगुन तो नोकर निघुन गेला.
रंजना म्हणाली,चला ताईसाहेब काकासाहेबांनी बोलावलंय आता जावं लागेल आपल्याला.
अगं पण पुढची कथा?
ती मी उद्या सांगेन तुम्हाला,न्हायतर,काकासाहेब रागावतील.
ठीकेय चल मग.
रात्रीच्या जेवणानंतर तिला झोपच येत नव्हती,तिला कथेच्या पुढच्या भागाची उत्सुकता झोपु देत नव्हती.रात्री उशीरा तिला झोप लागली....
रात्रीच्या उशीरच्या जागरणानंतर निशिता लवकर उठली होती.दिपक आणि विणाच्या प्रेमकथेविषयीची तिची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.फ्रेश होऊन ती रंजनाची वाट पाहत होती.थोड्या वेळाने रंजना वाड्यावर आली,रंजनाला पाहुन निशिताला आनंद झाला.ती लगेच तिथेच घेउन गेली जिथे काल त्या दोघी गेल्या होत्या.रंजनाला पुढची कथा ऐकवण्यासाठी विनवणी करु लागली.
अहो थांबा ताईसाहेब सांगते सांगते,तर काल मी कुठे होते?हां आठवलं...
विणाच्या लग्नाच्या बातमीनंतर दिपक स्वतःला सावरु शकत नव्हता.तो कासावीस व्हायचा,त्याच्या मनात विणाला भेटण्याची प्रबळ इच्छा व्हायची.आणि त्यामुळे तो तिचा गावोगावी शोध घेऊ लागला.पण ती त्याला सापडत नव्हती.तिच्या आठवणीत तिची जुनीच पत्रे वाचायचा.एक दिवस तिचा त्याला शोध लागला.तो लगबगीने त्या पत्त्यावर गेला.पण समोरचा प्रसंग बघुन त्याच्या पायाखालची जमीन सरकली.त्याच आभाळ फाटलं.त्याच्या समोर विणाचं प्रेत स्मशानात नेत होते.ते बघुन त्याच्या डोळ्यातले अश्रु हृदयातच कैद झाले,आणि तो वेडा झाला.तेव्हापासुन आजपर्यँत तो वेडाच आहे....
विणाची आणि दिपकची ही कहाणी ऐकुन निशिताने भरल्या डोळ्याने रंजनाला प्रश्न विचारला.पण विणाचा मृत्यु कसा झाला?आणि दिपक आता कुठे आहे?
विणाला दिपकच्या प्रेमाचा विरह सहन झाला नाही आणि तिने आत्महत्या केली,हा योगायोग इतकाच कि दिपकने विणाला शेवटच्या दिवशीच पाहीलं.त्याच्या वेडेपणानंतर काकासाहेब(देशमुख)यांनी त्याला गावात आणलं त्यानंतर तो या गावातच फिरत असतो.....
तु मला त्याच्या घरी घेऊन जाऊ शकतेस का?निशिताने विचारले.
हो।चला आपण तिकडेच जाऊ.
त्या दोघी दिपकच्या घरी गेल्या,घराचे दार उघडेच होतं,त्या दोघी आत गेल्या.घरातलं सामान अस्तव्यस्त पडलं होतं.निशिता एकेक गोष्ट व्यवस्थित पडताळत होती.तिला विणाची ती पत्रे मिळाली जी दिपकने जपुन ठेवली होती.एक गोष्ट पाहुन तिला समजलं की दिपक हा तोच वेडा होता,ज्याने माझ्या हातातुन कादंबरी घेतली होती.कारण ती कादंबरी सुद्धा निशिताला तेथेच मिळाली...
नंतर त्या दोघी वाड्यावर गेल्या.
निशिताला तिच्या novel writing साठी एक जबरदस्त विषय मिळाला होता.गावातच राहुन पुढच्या सहा महीन्यात दिपक आणि विणाच्या प्रेमावर इंग्रजीमध्ये कादंबरी लिहीली.वितरकांशी बोलणी झाली.कादंबरी छापली गेली.विणा दिपकच्या प्रेमकहाणीवर वाचकांनी उड्या घेतल्या.पुढच्या चार सहा महीन्यातच ही कहाणी bst selling novels च्या रांगेत जाऊन बसली.विणा आणि दिपकच्या प्रेमकहाणीला जागतिक स्तरावर नेण्याचा निशिताचा हेतु साध्य होत होता.पण अजुन एक गोष्ट बाकी होती ते म्हणजे बुकर पुरस्कारावर या कादंबरीचं नाव कोरणं.आणि शेवटच्या काही कादंबर्यांमधुन याच कादंबरीने हा पुरस्कार पटकावला.संपुर्ण देशात या कादंबरीचा उदोउदो होत होता.पण निशिताच्या डोळ्यात अश्रु होते.कारण त्यावेळी तिला विणाने दिपकला लिहीलेलं शेवटचं पत्र हाती लागलं होतं,ज्यामध्ये विणाने म्हटलं होतं..तुझ्याशिवाय जगण्यासाठी माझ्याकडे आयुश्यच नाहीये.वडीलांच्या हट्टापुढे नाईलाजाने जोडलेलं हे नातं,मला डोईजड होत होतं.मला माहीतीये आपण सोबत जगण्यामरण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या पण,तुझी साथच नसेल तर अशा जगण्याला अर्थ तो काय?पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मृत्युनंतरही तु जगायचंस भरपुर जगायचंयस.मी जगेन अथवा मरेन पण मरेपर्यँत आणि मेल्यानंतरही फक्त तुझ्यावरच प्रेम करेन........

मित्रांनो या कथेतुन योग्य तो बोध घ्या.जो दिवस तुम्ही तुमच्या मरणासाठी ठरवला असेल कदाचित तोच दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुखाचा दिवस देखील असु शकतो पण ते सुख भोगण्यासाठी तुमच्याकडे आयुष्यतर नक्कीच शिल्लक असलं पाहीजे ना?so b positive............